Satej Patil | टिळक आणि जगताप यांच्या मतदानावरून काँग्रेसचा अक्षेप : सतेज पाटील – tv9
मुक्ता टिळक यांनी मतपत्रिकेवर आपली सही करत दुसऱ्याच्या हातात दिली. त्यानंतर ती मतपेटीत टाकण्यात आली आमचा त्यावरच आक्षेप आहे.
मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान पार पडताच पावसाळ्यातील गारव्यातही राज्याचे राजकारण चांगलेच तापले. यावेळी भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि मुक्ता टिळक यांनी गुप्त मतदानाचा भंग केल्याचा आरोप काँग्रेसने (Congress) केला. तसेच याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार ही करण्यात आली. त्यावरून आता आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. दरम्यान याचवरून राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी ते म्हणाले, दहा दिवसांपूर्वीच पार पडलेल्या निवडणूकीत या दोघांनी योग्य पद्धतीने मतदान स्वत: केले. मात्र यावेळी त्यांनी मतदान प्रक्रियेतील नियम मोडले. मुक्ता टिळक यांनी मतपत्रिकेवर आपली सही करत दुसऱ्याच्या हातात दिली. त्यानंतर ती मतपेटीत टाकण्यात आली आमचा त्यावरच आक्षेप आहे. आणि त्यावरूनच आम्ही निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार दिली असल्याचे ते म्हणाले.