जात सांगितली तरच खत; केंद्राच्या निर्णयावर सतेज पाटील यांची सडकून टीका
केंद्र शासनाने देशांमध्ये कारण नसताना शेतकऱ्यांना त्रास देण्याची भूमिका असल्याचेच यातून समोर येत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
मुंबई : खतं घेण्यासाठी केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी ई पास मशिन तयार करण्यात आलं आहे. त्यात माहिती भरताना जात टाकावी लागते. यावरून काँग्रेसचे विधान परिषद गटनेते सतेज पाटील यांनी केंद्र सरकावर सडकून टीका केली आहे. केंद्र शासनाने देशांमध्ये कारण नसताना शेतकऱ्यांना त्रास देण्याची भूमिका असल्याचेच यातून समोर येत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. एका बाजूला खताचे दर वाढलेत आणि दुसऱ्या बाजूला केंद्रशासन मागच्या दारानं या देशातल्या शेतकऱ्यांचा डाटा गोळा करत असल्याचा आरोप देखिल पाटील यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांचा हा डाटा गोळा करत असताना त्यांच्या जातीचा डाटाकडून गोळा करून निवडणुकीसाठी तो वापरायचा आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. एका बाजूला शेतकरी अडचण येत आहे. अवकाळीच संकट या ठिकाणी चालू आहे. दुसऱ्या बाजूला खताचे दर आकाशाला भिडलेले असताना जात सांगितली गेली पाहिजे तरच तुम्हाला खत देणार असा कायदा केंद्र करत आहे. शेतकऱ्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केंद्र शासनाचा आहे.