Satish Bhosale : खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
Satish Bhosale Case Updates : आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेला पोलिसांनी बावी गावात आणलं असून घटनास्थळावर कसून चौकशी केली जात आहे. खोक्याने हरणांची शिकार केल्याचा पोलिसांना संशय आहे.
खोक्या उर्फ सतीश भोसले याने हरणांची शिकार केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे आता पोलिस आज खोक्याला घेऊन घटनास्थळी दाखल झाले आहेत. शिरूर कासार तालुक्यातील बावी गावात खोक्याला आणण्यात आलेलं आहे. तिथे त्याची कसून चौकशी आणि तपास केला जात आहे. ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी देखील पोलिस त्याची चौकशी करत आहेत.
सतीश भोसले उर्फ खोक्या हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. शिरूर येथील मारहाण प्रकरणात तो आरोपी आहे. खोक्याला अटक केल्यानंतर त्याला काल न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर आता पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. आज तपासकामासाठी त्याला पोलिसांनी शिरूर कासार येथील बावी गावात घटनास्थळी आणलं आहे. खोक्याने हरणांची शिकार केल्याचा संशय पोलिसांना आहे.

खोक्याचं घर जाळण्याची घाई का? धसांचा सवाल तर कराडचं जाळा, कोणाची मागणी

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..

'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?

युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
