अनैतिक संबंधातून सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, मुलाच्या मित्राच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा
भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली होती.अनेक वार झाल्याने बसलेल्या धक्क्यातून त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांना अटक करण्यात आली आहे.
भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरणातून हत्या झाली होती. या प्रकरणात चार मारेकऱ्यांना अटक झाली होती. आता या प्रकरणात सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिला आणि तिचा प्रियकर अक्षय जवळकर यांना काल अटक केली आहे. या प्रकरणात मोहिनी वाघ यांना पोलिसांना केलेल्या उलट तपासणीत पतीची हत्या केल्याची कबूली दिली आहे. या मोहिनी वाघ यांचे त्यांच्याकडे फुरसुंगी येथे 16 वर्षे भाड्याने राहणाऱ्या अक्षय जवळकर याच्याशी अनैतिक संबंध होते. आपले पती आपल्याला मारहाण आणि शिवीगाळ करीत होते. तसेच सर्व आर्थिक व्यवहार आपल्या हातात घ्यायचे होते त्यातून पतीची हत्या केल्याचे मोहिनी वाघ यांनी म्हटल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त ( गुन्हे ) शैलेश बलकवडे यांनी सांगितले आहे. सतीश वाघ यांची अक्षय जवळकर याने पाच लाखांची सुपारी मारेकऱ्यांना दिली होती. त्यापैकी काही रक्कम एडव्हान्स म्हणून दिली असल्याचे शैलेश बलकवडे यांनी सांगितले.