भाजपचा तुम्हाला पाठिंबा?, सत्यजीत तांबे म्हणाले मला ‘त्यांचा’ फुल सपोर्ट!
सत्यजीत तांबे यांना भाजपचा पाठिंबा असल्याचं बोललं जातंय. त्यावर सत्यजीत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. काय म्हणालेत? पाहा...
राज्यात सध्या विधान परिषदेच्या पदवीधर जागांसाठी निवडणूक होत आहे. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणूक (Nashik Graduate Vidhan Sabha Elections)आणि सत्यजीत तांबे यांची उमेदवारी यावरून राजकीय वर्तुळात बऱ्याच घडामोडी पाहायला मिळाल्या. सत्यजीत तांबे यांना भाजपचा पाठिंबा असल्याचं बोललं जातंय. त्यावर सत्यजीत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “मी अपक्ष उमेदवार आहे. मला अनेक संघटनांचा पाठिंबा आहे. मला टीडीएफ, शिक्षक भारती, कनिष्ट महाविद्यालय महासंघाने पाठिंबा दिलाय.वेळ आल्यावर मी सगळ्या बाबींवर बोलेन”, असं सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) म्हणालेत.
Published on: Jan 22, 2023 07:54 AM
Latest Videos