सत्यजित तांबे यांच्यासमोर आधी आव्हान आणि आता नवा आरोप
जमीन खरेदी आणि शैक्षणिक पात्रतेवरून सत्यजित तांबे गोत्यात आले आहेत. वकील अभिषेक हरीदास यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे ( SATYAJIT TAMBE ) यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील ( SHUBHANGI PATIL ) यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे सत्यजित तांबे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
यापाठोपाठ सत्यजित तांबे यांच्यावर वकील अभिषेक हरीदास यांनी एक गंभीर आरोप केला आहे. सत्यजित तांबेंनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिली आहे. तांबे यांच्या २०१४, २०१९ आणि २०२३ च्या शपथपत्रात तफावत आहे असं वकिलांनी म्हटलंय.
सत्यजित तांबे यांची कोणती पदवी खरी असा साहिल त्यांनी केला आहे. तसेच, जमीन खरेदी आणि म्युच्युअल फंडाचा तपशील त्यांनी लपवला असा आरोप तांबे यांच्यावर करण्यात आलाय.
Published on: Jan 14, 2023 05:14 PM
Latest Videos