सत्यजित तांबे भाजपात जाणार? आज घेणार देवेंद्र फडणवीस यांची भेट
नाशिक पदवीधर मतदारसंघातील विजयी उमेदवार सत्यजित तांबे हे भाजप प्रवेश करणार का? याचे उत्तर आज मिळणार आहे. सत्यजित तांबे हे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघातील विजयी उमेदवार सत्यजित तांबे हे भाजप प्रवेश करणार का? याचे उत्तर आज मिळणार आहे. सत्यजित तांबे हे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, नाशिकमधील विजयानंतर आज सत्यजित तांबे यांची भेट होणार आहे. त्यांचा मला फोन आला होता. नाशिकमध्ये आमचा उमेदवार नसल्यामुळे आमच्या लोकांनी त्यांना सहकार्य केले असेल. कारण आम्ही हा निर्णय लोकल नेत्यावर सोडला होता. तांबे आमच्या पक्षात येणार की नाही यावर काही बोलणार नाही. पण त्यांनी जी घोषणा केली आहे त्या अनुरुप आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यांच्या भेटीनंतर काही निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Published on: Feb 06, 2023 10:24 AM
Latest Videos