मोठी बातमी! शरद पवार धमकी प्रकरणातील सौरभ पिंपळकर माध्यमांसमोर...

मोठी बातमी! शरद पवार धमकी प्रकरणातील सौरभ पिंपळकर माध्यमांसमोर…

| Updated on: Jun 16, 2023 | 6:30 PM

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. फेसबुक पेजवरुन शरद पवार यांना धमकी देण्यात आली होती.या धमकी प्रकरणात अमरावती येथील भाजप कार्यकर्ते सौरभ पिंपळकर यांचे नाव समोर येत होते. अखेर सात दिवसांनंतर सौरभ पिंपळकर माध्यमांसमोर आला अन् आपली भूमिका मांडली.

अमरावती: काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. फेसबुक पेजवरुन शरद पवार यांना धमकी देण्यात आली होती.या धमकी प्रकरणात पुणे शहरातून सागर बर्वे (३४) याला अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणी अमरावती येथील भाजप कार्यकर्ते सौरभ पिंपळकर यांचे नाव समोर येत होते. अखेर सात दिवसांनंतर सौरभ पिंपळकर माध्यमांसमोर आला अन् आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, “शरद पवार यांच्या धमकी प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. शरद पवार यांचा दाभोळकर होईल, या पोस्टशी माझा काहीच संबंध नाही. मात्र सुप्रिया सुळे यांनी ते ट्विट माझ्या नावाने दाखवलं. माझ्यावर आरोप केले. मी सुप्रिया सुळे, रोहित पवार, अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार आहे.”