विजय वडेट्टीवार यांच्या कन्येला वीर सावरकरांच्या नातूचं खुलं आव्हान, चॅलेंज स्वीकारणार?
VIDEO | विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्या 'त्या' वक्तव्यावर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांची आक्रमक प्रतिक्रिया म्हणाले...
पुणे : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर (Satyaki Savarkar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवानी वडेट्टीवार यांनी केलेला दावा चुकीचा असून सावरकरांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हणत त्यांनी शिवानी वडेट्टीवार यांना खुलं आव्हान दिलं आहे. सात्यकी सावरकर हे शिवानी वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले, मी शिवानी वडेट्टीवार यांचा व्हिडीओ बघितला. त्या व्हिडीओत अतिशय चुकीचं विधान करण्यात आलं आहे. सावरकरांनी असं कोणतंही वाक्य सहा सोनेरी पानं या पुस्तकात लिहिलेलं नाही. त्यांनी तसं स्टेटमेंट काढून दाखवावं. असं कोणतंही स्टेटमेंट या पुस्तकात नाही. मी स्वत: पुस्तक वाचलेलं आहे.