अँटिलिया, मनसुख हिरेण हत्याप्रकरण! माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेण हत्याप्रकरण चांगलेच गाजले होते. त्याप्रकरणी माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे.
मुंबई : 23 ऑगस्ट 2023 | दोन ते अडिच वर्षांपुर्वी माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे चर्चेत आले होते. तर ते अँटिलिया स्फोटक, मनसुख हिरेण हत्येप्रकरणी तुरूगांत गेले होते. त्यानंतर आता त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाला दिलासा असून त्यांचा जामीन हा न्यायालयाने मंजूर केला आहे. मनसुख हिरेन या व्यावसायिकाची हत्या झाली होती. तर त्याच्या गाडीतून स्फोटके अंबानींचे निवासस्थान अँटिलिया जवळ ठेवण्यात होती. याप्रकरणी सचिन वाझे याच्यासह अनेक मोठे पोलिस अधिकारी सापडले होते. ज्यात एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांचे नाव समोर आले होते. ज्यामुळे त्यांनी तुरूंगात जावं लागलं होते. त्यानंतर याप्रकरणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. तसेच जामीनासाठी विनंती केली होती. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून प्रदीप शर्मा यांना जामीन मिळाला आहे.
Published on: Aug 23, 2023 02:06 PM
Latest Videos