Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणराया समोर साकारलं लोअर परळ स्टेशन...

गणराया समोर साकारलं लोअर परळ स्टेशन…

| Updated on: Sep 02, 2022 | 9:14 AM

लोअर परळस्टेशनवर प्रतिष्ठापणा केलेली गणरायाची मूर्ती लक्ष वेधून घेणारी आहे. त्याबरोबर मुंबईच्या डबेवाल्यांचे डबे आणि लोअर परळ स्टेशन, प्रवासी असा अ्प्रतिम देखावा त्यांनी साकारला आहे. 

सध्या महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे, त्यानिमित्ताने लोअर परळमधील कविता पाटील यांनीही मुंबईच्या डबेवाल्यांबद्दल कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी डबेवाल्यांची प्रतिकृती साकारून लोअर परळ स्टेशनचा देखावा साकारला आहे. उभेउभ दिसणाऱ्या लोअर परळ स्टेशनचा देखावा का साकारावा वाटला असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, गिरणगावामध्ये लहानाचे मोठ्या झालेल्या कविता पाटील यांनी डबेवाल्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण हा देखावा साकार केल्याचे त्या सांगतात. त्यांनी गणेश मूर्तीही आकर्षकपणे सादर केली आहे. लोअर परळस्टेशनवर प्रतिष्ठापणा केलेली गणरायाची मूर्ती लक्ष वेधून घेणारी आहे. त्याबरोबर मुंबईच्या डबेवाल्यांचे डबे आणि लोअर परळ स्टेशन, प्रवासी असा अ्प्रतिम देखावा त्यांनी साकारला आहे.

Published on: Sep 02, 2022 09:14 AM