‘एक रंग एक गणवेश’ धोरणावरून वाद! महिला सदस्याने केसरकर यांना फटकारलं; म्हणाली, ‘6 महिने अगोदर…’
शाळा सुरू होण्यास अवघे 20 एक दिवस बाकी असताना अद्याप शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व सरकारी शाळांबाबत 'एक रंग एक गणवेश' धोरणाबाबत अधिकृत निर्णय जाहीर झालेला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळा व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांसोबत 11 मे रोजी बैठक घेतल्यानंतर घोषणा केली.
मुंबई : राज्यात ‘एक रंग एक गणवेश’ धोरण यावर्षी राबवले जाणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू होत आहे. शाळा सुरू होण्यास अवघे 20 एक दिवस बाकी असताना अद्याप शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व सरकारी शाळांबाबत ‘एक रंग एक गणवेश’ धोरणाबाबत अधिकृत निर्णय जाहीर झालेला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळा व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांसोबत 11 मे रोजी बैठक घेतल्यानंतर घोषणा केली. त्यावरून आता वाद होताना दिसत आहे. यावरूनच निर्मिती एज्युकेशन सोसायटीच्या सदस्या रोहिणी गंधे यांनी दिपक केसरकर यांच्यावर निशाना साधला आहे. तसेच गणवेशाबदल जी आता घोषणा केली ती 6 महिने अगोदर करायला हवी होता. तसे झाले असते तर त्याचं सर्वांनी स्वागत केले असतं. मात्र आता काहीच दिवस असताना अशी घोषणा केली गेली आहे. काही शाळा खेडा पाड्यात आहेत. त्यामुळे तेथील आई वडील आपल्या पाल्यांना तीन दिवस वेगळा व 3 दिवस वेगळा असा गणवेश घालून पाठतील का? असा सवाल केला आहे. तर मंत्रालयातील वरिष्ठांपासून ते कनिष्ठ वर्गातील कर्मचारी तसेच मंत्र्यांच्या मुलांना दुर्गम भागात शिक्षण सक्तीचे करा अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसे केल्यास मग बघा शिक्षण क्षेत्रातील विकास झपाट्याने होईल असेही त्या म्हणाल्या. तर केसरकर यांनी मंत्रालयातील एसीमध्ये निर्णय घेण्यापेक्षा पाड्यात येऊन निर्णय घ्या असा टोला लगावला आहे.