Video | आता त्यांनी ‘एक ओबीसी, लाख ओबीसी’ म्हणायला हरकत नाही, पंकजा मुंडे याचं आवाहन
राज्य सरकारने मराठ्यांसाठी कुणबी नोंद असलेल्यांच्या नातेवाईकांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात अध्यादेश काढला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या अनेक मागण्यांपैकी एक मागणी या अध्यादेशामुळे पूर्ण झाली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांचे अभिनंदन करीत असल्याचे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर हा कायदा पास होणार आहे. त्यामुळे आता दोन्ही समाजातील वितुष्ट कमी व्हावे असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
बीड | 28 जानेवारी 2024 : कुणबी नोदं असलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वागत केले आहे. मराठा वर्गातील गरीब तरुणांना आरक्षणाचा लाभ मिळावा ही त्यांची मागणी सरकारने मान्य केली आहे. मनोज जरांगे यांच्या अनेक मागण्यांपैकी एक मागणी या अध्यादेशामुळे पूर्ण झाली आहे. अर्थात या अध्यादेशांवर 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना मागविल्यानंतर हा कायदा पास होणार आहे. मराठाला कायद्यात बसणारे आरक्षण मिळावे अशी आमची मागणी असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. कुणबीचे सर्टीफिकेट घेऊन मराठा समाजाची एक पिढी ओबीसीत आलेली आहे. त्यामुळे आता त्यांनी एक मराठा, लाख मराठा म्हणायची गरज नाही. आता ते ओबीसीत आल्यामुळे त्यांनी एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणायला हरकत नाही अशी माझी अपेक्षा असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांचा विजय कोणा दुसऱ्याला नकारात्मक वाटणार नाही. लोकांच्या मनावर कुठलाही ओरखडा उठणार नाही. पूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील आणि विदर्भातील मराठा समाजाने कुणबी सर्टीफिकेट घेतली. त्यावेळी मराठवाड्यातील मराठ्यांनी कुणबी सर्टीफिकेट घेतली नव्हती. आता त्यांनी घेतली आहेत. त्यामुळे ओबीसीमध्ये दाटीवाटी तर होणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का तर बसणार आहे. दोन्ही समाजातील वितुष्ट नष्ट आता कमी व्हावे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं आणि आमचं म्हणणं आहे की मराठ्यांना राजकीय आरक्षणाची काही गरज नाही. कारण मराठ्यांमध्ये राजकीय दृष्ट्या भरपूर प्रस्थापित नेते झाले आहे.