कोल्हापुरच्या खोलखंडोबा मंदिरातील स्वयंभू शिवलिंग पाण्याखाली, पाहा व्हिडीओ
जमिनीपासून 17 फूट खोल असलेलं हे खंडोबा मंदिर पंचगंगा नदीपासून एक किलोमीटर अंतरावर आहे तरीही शिवलिंगावर येणाऱ्या पाण्याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
कोल्हापुर : पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं शहरातील खोलखंडोबा मंदिरातील(व) स्वयंभू शिवलिंग(Self-contained Shivling) पाण्याखाली गेले आहे. शनिवार पेठेतील या स्वयंभू खोल खंडोबा मंदिराला पुरातन तसेच भौगोलिक महत्त्व देखील आहे. ज्या ज्या वेळी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते त्या त्यावेळी या मंदिरातील शिवलिंग पाण्याखाली जातं. यावर्षी पहिल्यांदाच हे शिवलिंग पाण्याखाली गेल्याने भाविकांनी इथं दर्शनासाठी गर्दी केलीय. जमिनीपासून 17 फूट खोल असलेलं हे खंडोबा मंदिर पंचगंगा नदीपासून एक किलोमीटर अंतरावर आहे तरीही शिवलिंगावर येणाऱ्या पाण्याचा उलगडा अद्याप झालेला नाही. इतकंच नाही तर या मंदिराचे शिखर गोलाकार असल्याने हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक देखील मानला जात.
Published on: Jul 11, 2022 07:30 PM
Latest Videos