पद धोक्यात आल्याच्या वृत्तानं शिंदेंच्या मंत्र्यांचं टेन्शन वाढलं; फडणवीसांसोबत केली पाऊणतास चर्चा!

पद धोक्यात आल्याच्या वृत्तानं शिंदेंच्या मंत्र्यांचं टेन्शन वाढलं; फडणवीसांसोबत केली पाऊणतास चर्चा!

| Updated on: Jun 13, 2023 | 7:00 PM

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पाऊणतास चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.शिवसेनेतील 5 मंत्र्यांची मंत्रीपद धोक्यात असल्याच्या वृत्तावरून या मंत्र्यांचे टेन्शन वाढलं आहे.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पाऊणतास चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.शिवसेनेतील 5 मंत्र्यांची मंत्रीपद धोक्यात असल्याच्या वृत्तावरून या मंत्र्यांचे टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे या मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली.विशेष म्हणजे कॅबिनेट बैठकीपेक्षा मंत्र्यांच्या याच बैठकीला सर्वाधिक उशिर झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.आगामी मंत्रिमंडळ विस्तारात 5 मंत्र्यांना डच्चू मिळणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. संबंधित चर्चांचं भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी खंडन केलंय. पण तरीही शिवसेनेच्या मंत्र्यांचं टेन्शन वाढलं आहे.