BASS EVADACHA SWAPNA AAHE | ज्येष्ठ नागरिकांच्या बजेटकडून अपेक्षा

BASS EVADACHA SWAPNA AAHE | ज्येष्ठ नागरिकांच्या बजेटकडून अपेक्षा

| Updated on: Jan 27, 2022 | 5:38 PM

पुण्या(Pune)तील निवृत्त शिक्षक ओमप्रकाश कोरोनाचं संकट लवकर दूर व्हावं यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. कोरोना(Corona)काळात गेल्या दोन वर्षांपासून त्यांचं निवृत्ती(Retirement)नंतरचं नियोजन बिघडलंय आणि बचत योजनांनाही मोठा फटका बसलाय.

Budget 2022 Videos : पुण्या(Pune)तील निवृत्त शिक्षक ओमप्रकाश कोरोनाचं संकट लवकर दूर व्हावं यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. कोरोना(Corona)काळात गेल्या दोन वर्षांपासून त्यांचं निवृत्ती(Retirement)नंतरचं नियोजन बिघडलंय आणि बचत योजनांनाही मोठा फटका बसलाय. आता जवळपास दोन वर्ष झालेत, तरीही कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या वर्षी बजेटमध्ये निवृत्त वेतनधारकांसाठी कोणतीही विशेष तरतूद नव्हती. मात्र, यंदाच्या बजेटकडून त्यांना मोठी अपेक्षा आहे. निवृत्तीनंतरचं जीवन जगण्यासाठी पुणे एक चांगलं शहर मानलं जातं. काही जणांना पेन्शन मिळत असल्यानं इतर सरकारी सुविधांचा लाभ घेता येत नाही. मात्र बजेटमुळे गुंतवणूक आणि बचतीवर मोठा परिणाम होतो. गुंतवणुकीसाठी विशेष योजना नाहीत. त्यामुळे सरकारनं ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीतून चांगलं उत्पन्न देण्याची मागणी होतेय.