ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट याचं मोठं वक्तव्य, ‘कोश्यारी यांचं वागणं घटनेशी विसंगत...’

ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट याचं मोठं वक्तव्य, ‘कोश्यारी यांचं वागणं घटनेशी विसंगत…’

| Updated on: Jul 12, 2023 | 7:48 AM

याचदरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बाबती घातलेली स्थगितीही उठवण्यात आली आहे. त्यामुळे विधान परिषदेत आणखी १२ आमदार वाढणार आहेत.

पुणे : राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारची सध्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून जोरदार चर्चा सुरू आहे. याचदरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बाबती घातलेली स्थगितीही उठवण्यात आली आहे. त्यामुळे विधान परिषदेत आणखी १२ आमदार वाढणार आहेत. मात्र तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने दिलेली आमदार निवडीच्या यादीवर तत्कालिन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी योग्य निर्णय न घेतल्यानेच हा राजकीय पेच निर्माण झाला तर कोश्यारी यांचं वागणं घटनेशी विसंगत होतं असे मत ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी मांडले आहे. तसेच त्यांनी यावेळी, महाविकास आघाडी सरकारच्या काळातील राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी आता ग्राह्य धरली जाणार नाही असाही खुलासा त्यांनी केला आहे. तर आताचे शिंदे-फडणवीस-पवार सरकार हे नवीन 12 आमदारांची यादी राज्यपालांना देतील तिच आता ग्राह्य धरली जाईल. तर राज्यपाल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांची नियुक्ती करतील असेही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 12, 2023 07:48 AM