Monsoon Session : सत्ताधाऱ्यांची विधीमंडळ पायऱ्यांवर घोषणाबाजी, अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया-TV9

Monsoon Session : सत्ताधाऱ्यांची विधीमंडळ पायऱ्यांवर घोषणाबाजी, अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया-TV9

| Updated on: Aug 25, 2022 | 11:53 AM

शिवसेनेच्या व्हिजनरी नेतृत्वाला शिंदे गट आणि भाजपचे नेते घाबरत आहेत. तर शिंदे गटासह भाजपला हे कळून चुकलं की आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे उद्याचे नेतृत्व आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंचं विरोध करण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न भाजपसह शिंदे गट करत आहे.

अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस असून हा शेवटचा दिवस आहे. आजही सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक आणि विरोधकांच्या विरोधात सत्ताधिकारी असा सामना विधानभवनाच्या पायऱ्यांवर पहायला मिळाला. तर गेल्या चार दिवसांपासून शिंदे गटावर खोंक्यांवरून करण्यात आलेल्या टीकेनंतर आता सत्ताधारी शिंदे गटातील आमदार देखिल आक्रमक झाले आहेत. त्यांनी यावेळी शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. सत्ताधारी शिंदे गटातील आमदारांनी बॅनरबाजी करत आदित्य ठाकरे यांना टार्गेट केलं. त्यावर खासदार अरविंद सावतं यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले, शिवसेनेच्या व्हिजनरी नेतृत्वाला शिंदे गट आणि भाजपचे नेते घाबरत आहेत. तर शिंदे गटासह भाजपला हे कळून चुकलं की आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे उद्याचे नेतृत्व आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंचं विरोध करण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न भाजपसह शिंदे गट करत आहे.

 

Published on: Aug 25, 2022 11:53 AM