श्रीकांत शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामागे कारण काय? शंभूराज देसाई यांनी स्पष्टच सांगितलं...

श्रीकांत शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामागे कारण काय? शंभूराज देसाई यांनी स्पष्टच सांगितलं…

| Updated on: Jun 14, 2023 | 3:04 PM

राज्यात एकीकडे मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना राज्यातील विविध वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीने भाजप आणि शिंदे सेनेमध्ये आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे काल रात्रीच राजधानी दिल्ली इथं दाखल झाले, रात्री त्यांनी भाजपच्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई : राज्यात एकीकडे मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना राज्यातील विविध वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीने भाजप आणि शिंदे सेनेमध्ये आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे काल रात्रीच राजधानी दिल्ली इथं दाखल झाले, रात्री त्यांनी भाजपच्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या संदर्भात खासदार शिंदे यांनी या सगळ्या अफवा असून मी माझ्या व्यक्तिगत कामासाठी दिल्लीत आलोय असं सांगितलंय. राज्याचे मंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी देखील श्रीकांत शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. देसाई म्हणाले की, “श्रीकांत शिंदे हे लोकसभेचे खासदार आहेत. काही कामांचा पाठपुरावा करायला, दिल्लीतील काही कामांसाठी अनेक खासदार दिल्लीला जातात. आज दुपारी ते शाखा संपर्क अभियानासाठी मुंबईत येणार आहेत”.

Published on: Jun 14, 2023 03:04 PM