Video : इकडं निवडणूक आयोगाचा निकाल आला अन् तिकडं शहाजीबापूंनी डीजेवर ठेका धरला...

Video : इकडं निवडणूक आयोगाचा निकाल आला अन् तिकडं शहाजीबापूंनी डीजेवर ठेका धरला…

| Updated on: Feb 18, 2023 | 8:10 AM

शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाने काल निकाल दिला. या निकालानंतर शिंदेगटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी डॉल्बीच्या तालावर ठेका धरला. पाहा व्हीडिओ...

पंढरपूर : शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाने काल निकाल दिला. या निकालानंतर शिंदेगटाकडून ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. पंढरपुरात शिंदेगटाच्या वतीने डीजे लावत आनंद साजरा करण्यात आला. यावेळी शिंदेगटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी डॉल्बीच्या तालावर ठेका धरला. आमदार शहाजीबापूंनी आनंदाच्या भरात धरल्याचं पाहून कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आला आणि अन् जल्लोषाचं वातावरण पंढरपुरात पाहायला मिळालं. शिंदे गटाला शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यावर शहाजीबापूंच्या महुद या मूळगावी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

Published on: Feb 18, 2023 08:10 AM