लवकरच शहाजी बापू काढणार नवा सिनेमा, संजय राऊत यांच्या ‘डायरी ऑफ खोका’या चित्रपटाला देणार टक्कर
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. "शिंदे गटाला मी पक्ष मानत नाही. हा कोंबड्यांचा खुराडा आहे." यावर शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुळात संजय राऊत हे बारक्या खुराड्यात बसले आहेत.
सोलापूर : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. “शिंदे गटाला मी पक्ष मानत नाही. हा कोंबड्यांचा खुराडा आहे.” यावर शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुळात संजय राऊत हे बारक्या खुराड्यात बसले आहेत. आमचा पक्ष आहे हे जाहीररित्या निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. आता संजय राऊत नेमक्या कोणत्या पक्षाच्या बाजूने बोलत आहेत त्यांना समजतं नाही, असे पाटील म्हणाले. तसेच ‘महाराष्ट्र डायरी ऑफ खोका’ या संजय राऊत यांच्या चित्रपटाला टक्कर द्यायला शहाजीबापू पाटील देखील चित्रपट काढणार असल्याचं बोलले.’माकडाच्या हाती कोलीत’ असा चित्रपट शहाजी बापू काढणार आहेत. “य राऊत ठाकरे गटाचा बुद्धिभेद करण्याचं काम करीत आहे.आम्हाला किती जागा मिळणार हे संजय राऊत यांनी बोलू नये”, असे शहाजी बापू पाटील म्हणाले.
Published on: May 26, 2023 04:17 PM
Latest Videos