पेपर फूटी प्रकरण : कोल्हापूर शहरातील या महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांवर बडतर्फिची कारवाई
याप्रकरणी महाविद्यालयातील चार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून त्या चारही कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षेदरम्यान कोल्हापुरातील शहाजी महाविद्यालयात पेपर फुटीचा प्रकार घडला होता.
कोल्हापूर, 10 ऑगस्ट 2023 । कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षेदरम्यान झालेल्या पेपर फूटी प्रकरणी आता कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी महाविद्यालयातील चार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून त्या चारही कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षेदरम्यान कोल्हापुरातील शहाजी महाविद्यालयात पेपर फुटीचा प्रकार घडला होता. येथे बीकॉमच्या ऍडव्हान्स अकाउंटन्सी या विषयाचा पेपर फुटला होता. त्यानंतर या प्रकरणाची विद्यापीठाने गंभीर दखल घेतली होती. अखेर या पेपर फुटी प्रकरणी कॉलेज प्रशासनाने चार कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे. यामध्ये एका वरिष्ठ लिपिकासह दोन लिपिक आणि एका रजिस्टारचा समावेश आहे. संबंधित चारही कर्मचाऱ्यांना विद्यापीठ परीक्षा प्रमाद समितीने दोषी ठरवलं होतं. तर समितीच्या अहवालानंतर कॉलेज प्रशासनाने तातडीने ही कारवाई केली आहे. तर पेपर फुटी प्रकरणी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाईची ही पहिलीच घटना असल्याचं बोललं जात आहे.