संजय राऊत म्हणजे नारदमुनी शहाजीबापू पाटील यांचा खोचक टोला

संजय राऊत म्हणजे नारदमुनी शहाजीबापू पाटील यांचा खोचक टोला

| Updated on: Oct 18, 2022 | 5:33 PM

माझी महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की तुम्ही संजय राऊत यांच्यापासून दूर रहा. अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. 

सोलापूर : अंधेरी पोटनिवडणूकी संदर्भात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पत्राद्वारे केलेले भावनिक आवाहन म्हणजे भाजपची स्क्रिप्ट होती. संजय राऊत यांच्या (Sanjay Raut) विधानावर शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) म्हणतात संजय राऊत हे पौराणिक कथेतील नारदमुनी यांचं पात्र आहे. सगळं काही सुरळीत चालू असतानाही त्यांना ते बघवत नाही, काडी लाऊन वातावरण पेटवण्याचं काम ते नेहमी करत असतात. माझी महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की तुम्ही संजय राऊत यांच्यापासून दूर रहा. असं आवाहन शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीमधून शिंदे गट आणि भाजपने पराभवाच्या भीतीने माघार घेतली असल्याचं काही नेते बोलत आहेत. भाजपवर झालेल्या आरोपाबद्दल बोलताना शहाजीबापू म्हणाले की राज ठाकरे यांनी पत्रातून देवेंद्र फडणवीस यांना केलेले मार्मिक आवाहनावर फडणवीसांनी हा निर्णय घेतला होता, पराभव होणार नव्हता कारण ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे ते दिसून येतच आहे. मात्र दिवंगत आमदारांच्या पत्नीला संधी देणं हे सर्वांचचं काम आहे, असही परखड उत्तर शहाजीबापूंनी दिले आहे.

Published on: Oct 18, 2022 05:26 PM