मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांना तिकीट नाही; टिळक कुटुंब वेगळी भूमिका घेणार?

मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांना तिकीट नाही; टिळक कुटुंब वेगळी भूमिका घेणार?

| Updated on: Feb 04, 2023 | 2:32 PM

कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवाराची घोषणा झाली आहे. भाजप नेते हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी पहिली प्रतिक्रिया आली आहे. मुक्ता टिळक यांनी कायम जनतेच्या हिताची कामं केली. आजारपणातही त्यांनी काम केलं. त्यांनी जे काम केलं त्यावर अन्याय झाला, अशी प्रतिक्रिया शैलेश टिळक यांनी व्यक्त […]

कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवाराची घोषणा झाली आहे. भाजप नेते हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी पहिली प्रतिक्रिया आली आहे. मुक्ता टिळक यांनी कायम जनतेच्या हिताची कामं केली. आजारपणातही त्यांनी काम केलं. त्यांनी जे काम केलं त्यावर अन्याय झाला, अशी प्रतिक्रिया शैलेश टिळक यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.  घरातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी आमची मागणी केली होती. मात्र पक्षाने वेगळा निर्णय घेतलाय तो आम्हाला मान्य आहे. आम्ही वेगळा काही विचार करणार नाही, आम्ही पक्षासोबतच राहणार आहोत, असंही शैलेश टिळक यांनी स्पष्ट केलंय.

Published on: Feb 04, 2023 02:32 PM