Manipur Violence issue : ‘राऊत यांनी आगीत तेल ओतण्याचे काम करू नये’; शिंदे गटाच्या मंत्र्याने थेट खडसावलं, नेमकं कारण काय?
तर यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला तयार नाहीत. तर मोदी हे मणिपूर प्रकरणावर तेथील मुख्यमंत्र्यांचा राजीनामा देखील घेत नाहीत अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावरून शिंदे गटाचे नेते मंत्री शंभुराज देसाई यांनी राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.
सातारा, 10 ऑगस्ट 2023 । मणिपूर मे महिन्यापासून पेटलेला असून तो धगधगतोय. तेथे महिलांवर अत्याचार होत आहेत. मात्र त्या ठिकाणचे सरकार ते रोखण्यात अपयशी ठरलं आहे. तर यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला तयार नाहीत. तर मोदी हे मणिपूर प्रकरणावर तेथील मुख्यमंत्र्यांचा राजीनामा देखील घेत नाहीत अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावरून शिंदे गटाचे नेते मंत्री शंभुराज देसाई यांनी राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. देसाई यांनी, राऊत हे जागतिक विषयावर बोलतील. मी सर्व ज्ञानी आहे असा ते भास निर्माण करत आहेत. केंद्र सरकार मणिपूर प्रकरणावर भक्कम निर्णय घेत आहे. राऊत यांनी आगीत तेल ओतण्याचे काम करू नये असा दम देखील देसाई यांनी यावेळी दिला. जागतिक पातळीवरील सर्व माहिती फक्त त्यांनाच आहे असा त्यांचा समज असला तरी आम्ही त्यांच्या कोणत्याही गोष्टीला जास्त महत्त्व देत नाही असेही देसाई यांनी म्हटलं आहे.