“संजय राऊत सकाळचा 10 चा भोंगा, मध्यंतरी ते 100 दिवस विश्रांतीला गेले होते”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा टोला
मंत्री शंभूराज देसाई यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलंय. "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गद्दारांची गाडी चालवण्याची वेळ आली आहे", असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता.
रत्नागिरी: मंत्री शंभूराज देसाई यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलंय. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गद्दारांची गाडी चालवण्याची वेळ आली आहे”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता.यावर शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना काय काम आहे. तो सकाळचा 10 चा भोंगा मध्यंतरी 100 दिवस बंद होता, कारण त्यावेळी ते विश्रांतीवर गेले होते. राऊत यांनी अशी वक्तव्ये करू नये, नाहीतर पुन्हा एकदा विश्रांतीला जावे लागेल एवढेच आमचे म्हणणे आहे”, असं शंभूराज देसाई म्हणाले.
Published on: May 25, 2023 04:37 PM
Latest Videos