4 Minutes 24 Headlines : विचार बदलणारे देश काय सांभाळणार? शिंदे गटाच्या मंत्र्यांचा थेट सवाल

4 Minutes 24 Headlines : विचार बदलणारे देश काय सांभाळणार? शिंदे गटाच्या मंत्र्यांचा थेट सवाल

| Updated on: Mar 07, 2023 | 8:23 AM

शंभुराज देसाई यांनी याबाबतीत शरद पवार यांना विचारले आहे का? विचार बदलणारे देश काय सांभाळणार असा टोला ठाकरे यांना लगावला आहे.

ठाणे : होळीच्या पुर्वसंधेला ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आल्याने वातावरण तंग बनले होते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाद निवळला. मात्र दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. येथील शिवाईनगर शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला. त्यानंतर ठाकरे गटाकडून 50 खोक्यांच्या घोषणा देण्यात आल्या. याचदरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हे सर्व विरोधकांमध्ये आश्वासक, ते पंतप्रधान पदाचे दावेदार होऊ शकतात असे राऊत यांनी म्हटल्याने सत्ताधारी शिंदे गटातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. संजय शिरसाट यांनी राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे म्हटलं आहे. शंभुराज देसाई यांनी याबाबतीत शरद पवार यांना विचारले आहे का? विचार बदलणारे देश काय सांभाळणार असा टोला ठाकरे यांना लगावला आहे.

Published on: Mar 07, 2023 08:23 AM