‘राऊत यांची सवय अशी की काही घडलं की तं दुसऱ्यामुळं, कोणी कोणाचा पक्ष फोडत नाही’; शिंदे गटाच्या नेत्याचा टोला
याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी यांच्यावर निशाना साधला होता. शरद पवार यांच्याबाबत एकिकडे आदर आहे असं म्हणायचा आणि दुसरीकडे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मग का फोडला असा सवाल देखील राऊत यांनी केलाय.
सातारा, 10 ऑगस्ट 2023 । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं होतं. त्यांनी पवार यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता होती. मात्र काँग्रेसने तसे होऊ दिले नाही, असा दावा केला होता. यावरून आता राज्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी यांच्यावर निशाना साधला होता. शरद पवार यांच्याबाबत एकिकडे आदर आहे असं म्हणायचा आणि दुसरीकडे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मग का फोडला असा सवाल देखील राऊत यांनी केलाय. त्यावर शिंदे गटाचे नेते मंत्री शंभुराज देसाई यांनी राऊत यांचा खरपूस समाचार घेताना, कोणाचं वाईट झालं की त्यासाठी दुसरा जबाबदार आणि काही चांगल झाली की मी अशी त्यांची वृत्ती असल्याची घणाघाती टीका केली आहे. तर पवारांचा कोणी पक्ष फोडलेला नाही. पवारांना काँग्रेसने पंतप्रधान का केलं नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मोदी साहेबांच्या मते काँग्रेसमधील काही नेत्यांना अहंकार अहंपणा जो होता. त्यामुळेच काही नेत्यांना आपल्यापेक्षा दुसरा कोणी मोठा होऊ नये असं वाटत असावं. म्हणून शरद पवार हे पंतप्रधान झाले नसावेत.