अवकाळी प्रश्नावर अजित पवारांच नाव घेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर शंभूराज देसाईंनी साधला निशाना

अवकाळी प्रश्नावर अजित पवारांच नाव घेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर शंभूराज देसाईंनी साधला निशाना

| Updated on: Mar 08, 2023 | 1:00 PM

सभागृहातील विरोधकांची भूमिका ही सध्या राष्ट्रवादी पक्ष निभावत असल्याचे म्हणत शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे

मुंबई : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. तसेच सभागृहात हा प्रश्न लावून धरला यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात लक्ष घालून आहेत. तर सभागृहातील विरोधकांची भूमिका ही सध्या राष्ट्रवादी पक्ष निभावत असल्याचे म्हणत शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. तसेच या प्रश्नवर या दोघांनीही भ्र शब्द देखिल काढलेला नाही. तसेच ते या सभागृहाचे सदस्य आहेत. माजी मुख्यमंत्री आहेत. ते येथे येत आहेत स्वागत आहे. आता बघूया उद्धव ठाकरे राजकीय टोमणे मारतात की चांगल्या सूचना देतात असा टोला शंभूराज देसाई यांनी लगावला आहे