“ठाकरे गट फक्त राष्ट्रवादीत विलीन होणं बाकी”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची टीका
शिवसेनेचा आज 57वा वर्धापन दिन आहे. दोन्ही गटांकडून आज शक्तीप्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही गटांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान ठाकरे गटाकडून 20 जून जागतिक गद्दार दिन करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावर शिवसेनेचे नेते आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : शिवसेनेचा आज 57वा वर्धापन दिन आहे. दोन्ही गटांकडून आज शक्तीप्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही गटांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान ठाकरे गटाकडून 20 जून जागतिक गद्दार दिन करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावर शिवसेनेचे नेते आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आज ज्वलंत विचारांच्या हिंदुत्वाचं सोनं हे वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणातून ऐकायला मिळेल. एका बाजूला राष्ट्रवादी आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना अशा नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही. आम्ही जो उठाव केला तो स्वाभिमानासाठी केला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी केला. त्यामुळे त्यादिवसाला कुणीही काहीही म्हटलं तरी त्याला काही फरक पडत नाही. आता फक्त ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं बाकी राहिलं आहे.”