‘कचरा इकडचा तिकडे…’ राऊत यांच्या या वक्तव्यावर शंभूराज देसाई भडकले, म्हणाले, ‘त्यांना लखलाभ’

‘कचरा इकडचा तिकडे…’ राऊत यांच्या या वक्तव्यावर शंभूराज देसाई भडकले, म्हणाले, ‘त्यांना लखलाभ’

| Updated on: Jun 18, 2023 | 4:41 PM

मनिषा कायंदे आणि मुंबईतील तीन नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी, हा कचरा इकडे तिकडे उडत असतो. हवेचा झोका उलटला तर परत आमच्या दारात येतो. ते फार महान लोक नाहीत. सोडून द्या त्यांना, असं राऊत म्हणाले.

कल्याण : ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कायंदे आणि मुंबईतील तीन नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी, हा कचरा इकडे तिकडे उडत असतो. हवेचा झोका उलटला तर परत आमच्या दारात येतो. ते फार महान लोक नाहीत. सोडून द्या त्यांना, असं राऊत म्हणाले. त्यावरून शंभूराज देसाई यांनी राऊत यांना फटकारतं टीका केली आहे. त्यांनी, आधी 50 आमदार गेले, तेरा खासदार गेले, अजून लाईन लागेल उद्यापर्यंत अजून लागेल निवडणुकांपर्यंत अजून लागलं. मग हे सगळे असेच आहेत का? तुमच्याजवळ होते तोपर्यंत चांगली आणि तुमच्या पासून बाजूला गेली की वाईट असं म्हणणं बरोबर नाही. वस्तुस्थिती स्वीकारा असं बोलले आहेत. तर नेते, आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार अनेक राज्याचे प्रभारी आणि मोठ्या संख्येने लोक हे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत आहेत. मात्र दोन चार लोकच जर असं म्हणत असतील तर ते चुकीचं आहे. त्यांचं त्यांना लखलाभ होऊ द्या, आम्ही आमचा पक्ष वाढवायचे काम करतो. तर जे कोणी शिंदे यांच्यावर, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरती विश्वास ठेवून शिवसेनेत येत असतील तर त्या सगळ्यांचे स्वागत करायला आम्ही 24×7 सगळे तयार आहेत असेही ते म्हणालेत.

Published on: Jun 18, 2023 04:41 PM