राऊत मविआचे प्रमुख नाही, त्यांनी पवारांची जागा घेऊ नये, का भडकले देसाई?

राऊत मविआचे प्रमुख नाही, त्यांनी पवारांची जागा घेऊ नये, का भडकले देसाई?

| Updated on: Aug 02, 2023 | 11:45 AM

'लोकसभा निवडणुकीसाठी मविआमध्ये ठाकरे गट 48 जागा लढणार का? मविआच्या बैठकीत 16-16-16 चा फॉर्म्युला ठरलेला होता आणि आता संजय राऊत म्हणतात की 16-16-16 चा फॉर्म्युला आम्हाला मान्य नाही.हे बोलण्याआधी त्यांनी मविआला विचारलं का?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर तोफ डागली आहे. ‘लोकसभा निवडणुकीसाठी मविआमध्ये ठाकरे गट 48 जागा लढणार का? मविआच्या बैठकीत 16-16-16 चा फॉर्म्युला ठरलेला होता आणि आता संजय राऊत म्हणतात की 16-16-16 चा फॉर्म्युला आम्हाला मान्य नाही.हे बोलण्याआधी त्यांनी मविआला विचारलं का?संजय राऊत यांनी मविआतील पवार यांची जागा घेऊ नये’, अशी टीका देसाई यांनी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा मंत्री शंभूराज देसाई यांनी समाचार घेतला आहे. ‘जयंत पाटील यांच्यावर राऊत यांच्या संगतीच्या परिणाम झाला आहे, असा टोला शंभूराज देसाई यांनी लगावला.तसेच शंभूराज देसाई यांनी सुषमा अंधारे यांच्या प्रकरणावर ठाकरे गटाला फटकारले आहे.’सुषमा अंधारे यांनी आरोप फेटाळले तरी त्यांच्याच पक्षातील जिल्हाप्रमुखांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. मात्र जिल्हाप्रमुख खरं बोलला म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं. ठाकरे गटाने सुषमा अंधारे यांचा विषय गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे देसाई म्हणाले.

Published on: May 19, 2023 01:59 PM