कोणी कोणाचा वापर केला हे कळलं; शंभूराज देसाई यांचा राऊतांना टोला
कोणी कोणाचा वापर केला हे अडीच वर्षात कळलं. तर राष्ट्रवादी हा नंबर 1 ला गेला तर ठाकरेंचा पक्ष 5 वर गेला असा टोला देसाई यांनी लगावला.
मुंबई : राज्यात शिवसेना, भाजप आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात सध्या राजकीय धुळवड पहायला मिळत आहे. सध्या भाजप आणि मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे यांचे सरकार राज्यात आहे. त्यावरून भाजप तुमचा वापर करतयं हे भविष्यात कळेल असे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंना सतर्कतेचा इशारा दिला. त्याला शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं. कोणी कोणाचा वापर केला हे अडीच वर्षात कळलं अस देसाई यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी हा नंबर 1 ला गेला तर ठाकरेंचा पक्ष 5 वर गेला असा टोला ही त्यांनी लगावला आहे.
Published on: Mar 08, 2023 07:56 AM
Latest Videos