जाहिरातीचं आधी समर्थन आता यू-टर्न? शंभूराज देसाई म्हणतात, ‘महाराष्ट्रात आमचीच’
या जाहिरातीत ‘देशात मोदी अन् राज्यात शिंदे’ असा नारा देण्यात आला आहे. तर शिंदे यांना फडणवीस यांच्या पेक्षा अधिक पंसती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तर युतीत यामुळे मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे.
मुंबई : राज्यातील प्रमुख वृत्तपत्रात शिवसेना शिंदे गटाची एक जाहिरात प्रसिद्ध झाली. ज्यावरून राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे विरोधकांच्या रडावर आले आहेत. या जाहिरातीवरून आता शिंदे यांच्यासह शिंदे गटावर टीका होताना दिसत आहे.
या जाहिरातीत ‘देशात मोदी अन् राज्यात शिंदे’ असा नारा देण्यात आला आहे. तर शिंदे यांना फडणवीस यांच्या पेक्षा अधिक पंसती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तर युतीत यामुळे मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे.
याचदरम्यान आधी शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी जाहिरातीवरून मान हालवली होती. मात्र आता यू-टर्न घेत आहेत. याच जाहिरातीवरून समर्थन देणारे शंभूराज देसाई यांनी घुमजाव करत त्या जाहिरातीचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या हितचिंतकांनी ही जाहिरात दिली असावी, असं स्पष्टीकरण देसाई यांनी दिलं आहे.