शंभूराज देसाई यांचा अल्टीमेट, आज संध्याकाळपर्यंत विनायक राऊत यांना नोटीस पाठवणार

शंभूराज देसाई यांचा अल्टीमेट, आज संध्याकाळपर्यंत विनायक राऊत यांना नोटीस पाठवणार

| Updated on: May 31, 2023 | 2:37 PM

दोन दिवसापूर्वी खासदार विनायक यांनी शिंदे गटातील काही खासदार आणि आमदार पक्षात नाराज असल्याची माहिती दिली होती. यावर शंभूराज देसाई यांनी विनायक राऊत यांना मी दोन दिवसांचा वेळ दिला आहे. त्याचबरोबर मी माझ्या कायदेशीर सल्लागारांशी बोललेलो असून त्यानुसार कारवाई करणार आहे. त्यांनी माझ्याविरुद्ध केलेले वक्तव्य मागे घ्यावं,

मुंबई : दोन दिवसापूर्वी खासदार विनायक  राऊत  यांनी शिंदे गटातील काही खासदार आणि आमदार पक्षात नाराज असल्याची माहिती दिली होती. यावर शंभूराज देसाई यांनी विनायक राऊत यांना मी दोन दिवसांचा वेळ दिला होता. त्याचबरोबर मी माझ्या कायदेशीर सल्लागारांशी बोललेलो असून त्यानुसार कारवाई करणार आहे. त्यांनी माझ्याविरुद्ध केलेले वक्तव्य मागे घ्यावं, अन्यथा त्यांच्या विरुद्ध मी कायदेशीर कारवाई करणार आहे,”असं म्हटलं होतं. विनायक राऊत यांनी दोन दिवस उलटूनही  माफी मागतली नाही. याच पार्श्वभूमीवर दोन दिवस पूर्ण झाले आहेत मी आज डिफरमेशनची नोटीस त्यांना देणार आहोत.आज पाचच्या अगोदर त्यांना मी नोटीस देतो. ठाकरे गटाची परिस्थिती ही हतबल झाल्यासारखी आहे. त्यांना कितीही आरोप करायचे ते करुद्या. आम्ही काम करत राहू. ते आरोप करतील आणि आम्ही ऐकून घेऊ असं नाही. त्यांना आज नोटीस देतो त्यांनी व्यवस्थित उत्तर दिलं नाही तर आम्ही कायदेशीर बाबी पडताळू पाहू, असे देसाई म्हणाले.

Published on: May 31, 2023 02:37 PM