मातोश्रीने नितेश राणे यांचे हट्ट पुरवले, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका

“मातोश्रीने नितेश राणे यांचे हट्ट पुरवले”, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका

| Updated on: Jun 01, 2023 | 11:00 AM

ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी पुन्हा एकदा भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. "नितेश राणे यांना जनाची नाही, तरी मनाची लाज वाटू दे. स्वत:चं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघाचं वाकून अशी सवय नितेश राणे यांना आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी पुन्हा एकदा भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. “नितेश राणे यांना जनाची नाही, तरी मनाची लाज वाटू दे. स्वत:चं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघाचं वाकून अशी सवय नितेश राणे यांना आहे. नितेश राणे यांच्या अंगावरचे कपडेसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या आशीवार्दाने मिळाले आहेत.तुमचे लाड,हट्ट हे सुद्धा मातोश्रीने पुरवले आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांच्यापाठी ठाकरे गट आहे. कपटीपणामुळे राणे कुटुंबाला भाजपकडून तिकीट मिळणार नाही, त्यामुळे बॅग भरायची वेळ आली आहे”, असं शरद कोळी म्हणाले.

Published on: Jun 01, 2023 10:58 AM