“उद्धव ठाकरेंवर बोलण्याची तानाजी सावंताची औकात नाही”
शिवसेना नेते शरद कोळी यांनी तानाजी सावंत यांच्यावर सडकून टीका केली आहे.
मुंबई : शिवसेना नेते शरद कोळी (Sharad Koli) यांनी तानाजी सावंत यांच्यावर सडकून टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंनी वडिलांची विचारधारा सोडली नाही तर वडिलांची विचारधारा जपली म्हणूनच दिल्लीपुढे मुजरा केला नाही. उलट दिल्लीच्या सत्तेला लाथ मारली. उद्धव ठाकरेंवर बोलण्याची तानाजी सावंताची औकात नाही, अशा शब्दात त्यांनी टीका केलीय. तानाजी सावंतांना (Tanaji Sawant) कुणीही किंमत देत नाही. लोकांनी त्याच्याकडे बघावं म्हणून ते असं काहीही बोलत आहेत”, असं शरद कोळी म्हणाले आहेत.
Published on: Sep 25, 2022 04:22 PM
Latest Videos