‘नितेश राणे याचं तोंड आणि जीभ म्हणजे हातभट्टीची दारू हाणलेल्या बेवड्यासारखी’; शिवसेना नेत्याचं जशाचतस उत्तर
त्यांनी उद्धव ठाकरे यांनी लंडनमध्येच राहावं तर राऊत यांची जीभ लय वळवळ करते असं म्हटलं होतं. त्यावरून आता ठाकरे गटाकडून जशाचतस उत्तर देण्यात आलं आहे. ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी पुन्हा एकदा भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई : भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर खालच्या पातळीवर जात टिका केली होती. त्यांनी उद्धव ठाकरे यांनी लंडनमध्येच राहावं तर राऊत यांची जीभ लय वळवळ करते असं म्हटलं होतं. त्यावरून आता ठाकरे गटाकडून जशाचतस उत्तर देण्यात आलं आहे. ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी पुन्हा एकदा भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. शरद कोळी यांनी नितेश राणे यांचा समाचार घेताना, नितेश राणे याचं तोंड आणि जीभ एखाद्या संत्राची बाटली आणि हातभट्टीची दारू हाणलेल्या बेवड्या सारखी आहे. परत एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याबद्दल अपशब्द वापरलं तर ठाकरे गट आता गप्प बसणार नाही. तर नितेश राणे म्हणजे मस्तीने माजलेला बोकड असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर खालून वर पर्यंत तर मोजमाप केलं तर तीन ते साडेतीन फूट देखील उंची भरणार नाही. त्यामुळे टीका करताना विचार करावा. भाजपच्या जीवावर टीका करणाऱ्या नितेश राणे यांची लायकी आता भाजपला देखील कळली आहे. त्यामुळे ते त्यांच्या पेकाटात कधीही लाथ मारतील असंही शरद कोळी यांनी म्हटलेलं आहे.