अमोल मिटकरी यांच्यावर आव्हाडांचा पलटवार; म्हणाले, ‘काय त्यांचे मालकी हक्क पण तुम्ही…’
शरद पवार यांचा फोटो वापरण्यावरूनही नवीन वाद सुरू झाला आहे. शरद पवार यांनी आपला फोटो वापरण्याआधी माझी परवानगी घ्या असं म्हणताना अजित पवार आणि त्यांच्या गटाला इशारा दिला.
मुंबई : राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. त्यावरून आता कार्यकर्ता देखील विभागला जात असताना आता शरद पवार यांचा फोटो वापरण्यावरूनही नवीन वाद सुरू झाला आहे. शरद पवार यांनी आपला फोटो वापरण्याआधी माझी परवानगी घ्या असं म्हणताना अजित पवार आणि त्यांच्या गटाला इशारा दिला. तसेच ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझा आता वैचारिक मतभेद आहे. जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार. त्यामुळे मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. ज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहे. त्या पक्षाने माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये असे त्यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. त्यानंतरही रुपाली चाकणकर यांनी यांचा फोटो वापरला. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी चाकणकर यांना टोला लगावला होता. ज्यावर अमोल मिटकरी यांनी, शरद पवार आव्हाडांची खासगी मालमत्ता नाहीत. पवार सर्वांचे आहेत. आव्हाड यांनी अशी वक्तव्ये करू नयेत, या शब्दांत मिटकरी यांनी आव्हाड यांना सुनावलं होतं. त्यावरून आव्हाड यांनी पुन्हा एकदा मिटकरी यांच्या सह अजित पवार यांच्या गटावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी, फोटो वापरून नये असे मी नाही तर शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तुम्हाला ते जर नको से झाले असतील तर त्यांचा फोटो का वापरता असा सवाल केला आहे. तसेच ते अजून जीवंत आहेत. तो पर्यंत त्यांचा फोटो वापरायचा की नाही हे ते ठरवतील. ही त्यांची प्रोपर्टी आहे. की हा ही त्यांचा मालकी हक्क तुम्ही घेतलात असा खडा सवाल केला आहे.