Video : शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज देशातील लोकांचे प्रेरणास्थान- शरद पवार

Video : शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज देशातील लोकांचे प्रेरणास्थान- शरद पवार

| Updated on: May 12, 2022 | 2:47 PM

शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे या देशातील लोकांचे प्रेरणास्थान आहेत. कुठल्याही संकटाच्या काळात धैर्याने तोंड द्यायचे असेल तर कोणाचा तरी राजाश्रय लागतो. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे सर्वोच्च होते. त्यांच्यानंतर संभाजी महाराज संकटांपुढे धैर्याने उभे राहिले. त्यामुळे वास्तव चित्र तरुणांसमोर उभे करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त […]

शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे या देशातील लोकांचे प्रेरणास्थान आहेत. कुठल्याही संकटाच्या काळात धैर्याने तोंड द्यायचे असेल तर कोणाचा तरी राजाश्रय लागतो. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे सर्वोच्च होते. त्यांच्यानंतर संभाजी महाराज संकटांपुढे धैर्याने उभे राहिले. त्यामुळे वास्तव चित्र तरुणांसमोर उभे करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले. पुरंदर किल्ल्याला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की प्रत्येक किल्ल्याला इतिहास आहे. परंतु तो योग्य इतिहास योग्य पद्धतीने मांडला पाहिजे. दुर्दैवाने इतिहासाचे ध्रुवीकरण (Polarization) करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वसामान्य लोकांची ऐतिहासिक भावना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

Published on: May 12, 2022 02:47 PM