Sharad Pawar | ज्यांना पटेल त्यांनी धर्मवीर आणि ज्यांना त्यांनी… : शरद पवार
ज्यांना धर्मवीर म्हणायचं आहे त्यांनी धर्मवीर म्हणा आणि ज्यांना स्वराज्य रक्षक म्हणायचं आहे त्यांनी स्वराज्य रक्षक म्हणा असेही ते म्हणाले. तसेच धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक दोन्ही बिरूदावलीवरून वाद नको असे देखिल पवार म्हणाले.
मुंबई : विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वादग्रस्त विधानावरून सध्या चांगलाच गोंधळ उडालेला आहे. त्यांच्यावर आता टीका होत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी पवार यांनी संभाजी महाराजांना धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक दोन्ही उपाधी योग्य असल्याचेच म्हटलं आहे. त्यामुळे कोणाला काय म्हणायचं आहे ते म्हणा असा सल्ला दिला आहे.
अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याशी शरद पवार हे एकमत नसल्याचे दिसून येत. तर छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ बोललं तरी वावगं नाही. त्यांना धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक दोन्ही उपाधी योग्यच असल्याचं मतही पवार यांनी व्यक्त केलं आहे.
त्याचबरोबर काही लोक छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवार म्हणून धर्माचा अँगल देत असतीलस तरी काही तक्रार नासल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तर ज्यांना धर्मवीर म्हणायचं आहे त्यांनी धर्मवीर म्हणा आणि ज्यांना स्वराज्य रक्षक म्हणायचं आहे त्यांनी स्वराज्य रक्षक म्हणा असेही ते म्हणाले. तसेच धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक दोन्ही बिरूदावलीवरून वाद नको असे देखिल पवार म्हणाले.