छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक दोन्ही उपाधी योग्यच : शरद पवार
अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याशी शरद पवार हे एकमत नसल्याचे दिसून येत. तर छत्रपती संभाजी महाराजांना 'धर्मवीर' बोललं तरी वावगं नाही. त्यांना धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक दोन्ही उपाधी योग्यच असल्याचं मतही पवार यांनी व्यक्त केलं आहे.
मुंबई : विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त विधानावरून वादंग माजलं आहे. त्यावर भाजपकडून आंदोलने केली जात आहेत. यानंतर आता पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रीया दिली. त्यांनी या वादावर बोलताना, संभाजी महाराजांना धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक दोन्ही उपाधी योग्य असल्याचेच म्हटलं आहे.
अजितदादांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया देताना छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ बोललं तरी वावगं नाही असं म्हटलं आहे. त्याचबरोबर ‘संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ बोललं तरी अयोग्य नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याशी शरद पवार हे एकमत नसल्याचे दिसून येत. तर छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ बोललं तरी वावगं नाही. त्यांना धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक दोन्ही उपाधी योग्यच असल्याचं मतही पवार यांनी व्यक्त केलं आहे.