शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणाचं नागपूर कनेक्शन, संदीप गोडबोले पोलिसांच्या ताब्यात

शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणाचं नागपूर कनेक्शन, संदीप गोडबोले पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Apr 13, 2022 | 11:35 PM

नागपुरातील एका एसटी कर्मचाऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय. संदीप गोडबोले असं या एसटी कर्मचाऱ्याचं नाव असून तो यांत्रिक पदावर कार्यरत आहे. पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या वेळी गोडबोले हा सदावर्ते यांच्या संपर्कात होता, असा दावा केला जात आहे. गोडबोले याला चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या राड्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरूनच पवारांच्या घरावर एसटी कर्मचारी धडकल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येतोय. त्यानुसार सदावर्ते यांना अटकही करण्यात आला. इतकंच नाही तर पवारांच्या घरावरील हल्ल्याचं नागपूर कनेक्शनही सांगितलं जात होतं. तेच नागपूर कनेक्शन आता अखेर उघड झालं आहे. नागपुरातील एका एसटी कर्मचाऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय. संदीप गोडबोले असं या एसटी कर्मचाऱ्याचं नाव असून तो यांत्रिक पदावर कार्यरत आहे. पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या वेळी गोडबोले हा सदावर्ते यांच्या संपर्कात होता, असा दावा केला जात आहे. गोडबोले याला चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय.