बारामती अ‍ॅग्रो कारवाईनंतरही पवार का शांत? सत्ताधारी-विरोधकांत जुंपली

| Updated on: Sep 30, 2023 | 10:35 AM

tv9 marathi Special Report | बारामती अ‍ॅग्रोप्रकरणावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर हायकोर्टाकडून दिलासा मिळताच रोहित पवार यांनी सरकारला थेट इशारा दिलाय. मात्र या कारवाईनंतर शरद पवार यांनी शांत राहणंच पसंत केल्यानं त्यांच्यावर टीका होतेय

मुंबई, ३० सप्टेंबर २०२३ | बारामती अ‍ॅग्रोप्रकरणावरून रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाकडून दिलासा मिळताच रोहित पवार यांनी सरकारला थेट इशारा दिलाय. मात्र या कारवाईनंतर शरद पवार यांनी शांत राहणंच पसंत केलंय. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीला २८ तारखेला रात्री २ वाजता नोटीस दिली. ७२ तासांत प्लान्ट बंद करण्याचे आदेशही या नोटीसमध्ये देण्यात आले. तर या नोटीसीनंतर कंपनीने हाय कोर्टात धाव घेतली यानंतर कोर्टानं रोहित पवार यांना दिलासा दिलाय. तसंच ६ ऑक्टोबरपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे आदेशच दिलेत. याप्रकरणावरील सुनावणी ६ ऑक्टोबरला होणार असली तरी यावरून राजकारण मात्र चांगलंच तापलंय. हायकोर्टाने दिलासा दिल्यानंतर रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिलाय. बघा काय म्हणाले रोहित पवार?

Published on: Sep 30, 2023 10:30 AM
अजित पवार यांच्यानंतर शरद पवारही भाजपसोबत येणार? अन् अजितदादा मुख्यमंत्री होणार? कुणी केला दावा?
नितीन गडकरी यांच्याकडून आमदार, खासदारांना कानपिचक्या; म्हणाले, ‘रस्त्यांसाठी पैसे देणार पण विनंती आहे की…’