आगामी काळात तिन्ही पक्षांनी एकत्र लढावं

आगामी काळात तिन्ही पक्षांनी एकत्र लढावं

| Updated on: Jul 15, 2022 | 8:18 PM

आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडी एकत्र येणार का याचीच चर्चा होऊ लागली आहे.

उद्धव ठाकरे यांनी नुकताच शिवसेना आणि राष्ट्रवादीनं एकत्र लढायला हवं असं मत व्यक्त केले होते, त्यानंतर आज शरद पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेसबरोबर चर्चा करून पुढील निवडणुकींची योजना आखली जाईल असं सांगितले. मागच्या वेळी आपण कमी जागा लढविल्या होत्या, यावेळी अधिक जागा लढविण्यासंबंधी स्थानिक नेत्यांनी बसून चर्चा करावी. तुमचा जो निर्णय असेल त्याला पक्ष पाठिंबा देईल असंही त्यांनी यावेळी सांगितले. पक्षाचा पाया मजबूत करायचा असेल तर विधानसभा निवडणुकीला इथे सामोरे जावेच लागेल असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केले. त्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडी एकत्र येणार का याचीच चर्चा होऊ लागली आहे.

Published on: Jul 15, 2022 08:18 PM