‘उत्तरसभांपेक्षा बळीराजाच्या प्रश्नांवर उत्तर देणं गरजेचं’; अजित पवार यांच्या उत्तर सभेला राष्ट्रवादी नेत्याची टीका

‘उत्तरसभांपेक्षा बळीराजाच्या प्रश्नांवर उत्तर देणं गरजेचं’; अजित पवार यांच्या उत्तर सभेला राष्ट्रवादी नेत्याची टीका

| Updated on: Aug 22, 2023 | 12:04 PM

अजित पवार आणि शरद पवार हे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर एकमेकांच्या समोर ठाठले आहेत. शरद पवार हे बंडखोर अजित पवार गटातील आमदारांच्या मतदार संघात किंवा जिल्ह्यात ताऊन सभा घेत आहेत.

मुंबई : 22 ऑगस्ट 2023 | जिथं जिथं शरद पवार सभा घेतील तेथे आम्ही सभा घेऊ असा इशारा अजित पवार गटाकडून देण्यात आला होता. तर आता बीड येथे अजित पवार गटाची उत्तरसभा होणार आहे. त्याचदरम्यान राज्यातील कांदा उत्पादकांवर संकट ओढवल आहे. केंद्राकडून कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क वाढ करण्यात आली आहे. त्यावरून सध्या शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र दुसरीकडे अजित पवार गाटकडून बीड येथे उत्तरसभेची जोरदार तयारी केली सुरू आहे. यावरून शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे. त्यांनी कितीही उत्तर सभा झाल्या तरी बळीराजाच्या प्रश्नांना उत्तर देणं जास्त महत्वाचं असल्याचे सांगत टीका केली आहे. तर राजकारणामध्ये अडकण्यापेक्षा बळीराजा संकटात आहे त्याकडे लक्ष द्या असा टोला कोल्हेंनी राज्य सरकारला लगावला आहे. प्रत्येकवेळी राजकारण करण्यापेक्षा आपण या बळीराजाला दिलासा देण्यासाठी नेमकं काय करणार आहोत. पावसानं ओढ दिलेली आहे. दुष्काळजन्य परिस्थिती ही अनेक ठिकाणी आपल्याला दिसते. त्याविषयी आपण काय करणार आहोत? मला वाटतं अशा उत्तरसभांपेक्षा जास्त महत्वाचं हे बळीराजाच्या प्रश्नांवर उत्तर देणं.

Published on: Aug 22, 2023 12:04 PM