निधीवरुन खासदार कोल्हे यांचे अजित पवार यांच्यावर टीकास्त्र

निधीवरुन खासदार कोल्हे यांचे अजित पवार यांच्यावर टीकास्त्र

| Updated on: Aug 20, 2023 | 9:11 AM

महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांच्यावर निधीवाटपावरून टीका आणि आरोप होतच होते. आता देखील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये देखील होत आहे. यावेळी मात्र त्यांच्याच एका सहकारी खासदाराने थेट आरोप करत टीका केली आहे

पुणे : 20 ऑगस्ट 2023 | शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सामिल झाल्याने राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. तर अजित पवार हे पुन्हा एकदा अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री झाले आहेत. तर त्यांच्या पहिल्याच मंत्रीपदाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी शिंदे गटासह अजित पवार गटाच्या आमदारांवर कृपादृष्टी केली आणि निधीचा वाटप छप्पर फाड केला. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका होत आहे. याचवरून शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर थेट आरोप करत टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदार निधी पाच कोटी केलाय. तर केंद्राने खासदाराला सहा विधानसभा मतदार संघासाठी पाच कोटी केलाय. त्यामुळे खासदारांवर अन्याय होत आहे. कोल्हे हे जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना राजुरी येथील सभेत बोलत होते.

Published on: Aug 20, 2023 09:11 AM