मलिक अजित पवार गटात जाणार? सुप्रिया सुळे थेट म्हणाल्या, त्यांना कुणामुळे त्रास झाला ते...

मलिक अजित पवार गटात जाणार? सुप्रिया सुळे थेट म्हणाल्या, त्यांना कुणामुळे त्रास झाला ते…

| Updated on: Aug 16, 2023 | 2:54 PM

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे जामीनावर बाहेर आले असून ते वैद्यकीय कारणाने घरी आले आहेत. तर त्यांच्यासमोर आता शरद पवार गटात जायचं की अजित पवार गटात असा पेच निर्माण झाला आहे. त्यांना अजित पवार गटाने भेट दिली आहे

मुंबई : 16 ऑगस्ट 2023 | महाविकास आघाडीचे सरकार असताना नवाब मलिक हे मंत्री होते. त्यांच्यावर मनी लाँड्रींगसह कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप झाले होते. तर त्यांच्यावर ईडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला. ज्यामुळे ते गेली दिड एक वर्ष तुरंगात होते. जे आता वैद्यकिय कारणाने जामीनावर सुटले आहे. तर दोन महिन्याच्या जामीन सर्वोच्च न्यायालयाने मलिकांना देताना ईडीने कोणताही विरोध केला नाही. यामुळे यामागे भाजपची चाल असल्याची शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. तर याचदरम्यान आता त्यांनी आपल्या गटात घेण्यासाठी अजित पवार गट सक्रीय झाला आहे. अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांनी मलिक यांच्या घरी जाऊन भेट घेतली. तसेच चर्चा देखील केली. त्यावरून ते अजित पवार गटात जातील असे तर्क लावले जात आहेत. यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हटलं आहे सुप्रिया सुळे यांनी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Aug 16, 2023 02:54 PM