समितीच्या निर्णयावर अजित पवारांची भिस्त, पोहचले पक्ष कार्यालयात
त्यानंतर आज नव्या अध्यक्ष निवडण्यासाठी समितीची बैठक आज सकाळी मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात होणार आहे. त्यासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार हे पक्षाच्या कार्यालयात होचले आहेत.
मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांनी याचा निर्णय समितीची घेईल असे सांगत समितीची घोषणा केली होती. त्यानंतर आज नव्या अध्यक्ष निवडण्यासाठी समितीची बैठक आज सकाळी मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात होणार आहे. त्यासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार हे पक्षाच्या कार्यालयात होचले आहेत. तर समिती कोणता निर्णय घेणार याकडे कार्यकर्त्यांसह नेत्यांच लक्ष लागलेलं आहे. नव्या अध्यक्षाच्या शर्यतीत खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार आहेत. तर शरद पवार यांनीच अध्यक्ष पद सांभाळावं अशी समितीतील नेत्यांचं म्हणणं आहे. तर शरद पवारांनी राजीनामा दिल्यापासून या नेत्यांनी सलग तीन दिवस शरद पवारांबरोबर या विषयावर चर्चाही केली आहे. त्यामुळे आज काय होणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे. समितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, एकनाथ खडसे, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे.