अध्यक्ष निवडीत नाव चर्चेत असतानाच जयंत पाटलांना दिल्ली दाखवण्याचं काय कारण?
सरोज पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याचं नाव घेतलं. तर त्यांना दिल्लीला पाठवण्याची सुचना केली. त्यावरून आता नवे राजकारण काही सुरू आहे का अशी चर्चा रंगली आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यासह राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. तर अध्यक्ष निवडीवरून मतभेद समोर आले आहेत. एकीकडे अध्यक्षाच्या नावात खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), अजित पवार, प्रफुल पटेल यांची नावे आघाडीवर असतानाच सरोज पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याचं नाव घेतलं. तर त्यांना दिल्लीला पाठवण्याची सुचना केली. त्यावरून आता नवे राजकारण काही सुरू आहे का अशी चर्चा रंगली आहे. राज्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना मानणारा नेत्यांचा गट आहे. त्यातच जयंत पाटील (Jayant Patil) यांनाही मानणारा वेगळा गट आहे. त्यामुळे अनेक वेळा अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात मतभेद असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांना राज्यातून बाहेर काढत केंद्रीय जबाबदारी सोपवावी असा सुर तयार होत आहे. त्यावर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझी दुसऱ्या राज्यात ओळखी नाहीत. संपर्क नाही. त्यामुळे दिल्लीत बसणाऱ्या लोकसभेत किंवा राज्यसभेत काम करणाऱ्याकडे ही जबाबदारी द्यावी असे त्यांनी म्हटलं आहे. तर पक्ष राज्याबाहेर वाढवण्याचे काम ही व्यक्ती बरोबर करू शकतो. तर पवार यांनी हे काम बरोबर केलं. पण मी राज्यातच फिरलो आहे. त्यामुले मी कशाला दिल्लीला जाऊ. संसदेत बसून देश बघणाऱ्या व्यक्तीने ती जबाबदार घेतली पाहिजे असेही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.